आस ...
दूर देशी गेलास तू
येणार नाही माहित होते
तरीही मनात ठेऊन आस
वाट तुझी पाहत होते ..
गेलेली व्यक्ति परत येते का
स्वतःलाच विचारत होते
तरीही मनात ठेऊन आस
वाट तुझी पाहत होते ..
आज नाहीतर उद्या
कधीतरी हे होणारच होते
तरीही मनात ठेऊन आस
वाट तुझी पाहत होते ..
हाक मारल्यास लगेच येइन
आशवस्त तू केले होते
तरीही मनात ठेऊन आस...

No comments:
Post a Comment